युवा नेते प्रतिक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
कोल्हापुर:
अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष युवा नेते प्रतिक राजेंद्र साळुंखे यांचा ३१ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने भव्य समारंभ टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवित त्यांनी एक प्रेरणादायी आदर्श घालून दिला. विद्यार्थी संघटनेच्या वतीने देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच मराठा महासंघाच्या दिनदर्शिकांचे वाटप करण्यात आले.
वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र, “वाढदिवसावर नाहक खर्च व उधळपट्टी करण्यापेक्षा तोच निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरणे अधिक अर्थपूर्ण ठरेल,” असे मत जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विचारांना अनुसरून कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला.
या कार्यक्रमास विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सात्विक मोहिते, विराज पाटील, सुजल कुकडे, हर्षवर्धन यादव, अथर्व माळी, वेदांत चिले, अक्षय नाईक, नंदन मगदूम, आकाश पांढरे, आर्यमन सुतार, मैत्रयी सरदेसाई, पृथ्वीराज जाधव, सचिन जाधव, सिद्धेश दळवी, हर्षद जाधव, दीपराज कोळी, सचिन चौगुले, आशिष साने, ओंकार गालवे आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून, समाजात सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







