ICHMH51NEWS.IN
9921600800

समाजकार्याची जान असणारा युवा योद्धा प्रतिक साळुंखे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजकार्याची जान असणारा युवा योद्धा प्रतिक साळुंखे

कोल्हापूर

३१ जानेवारी वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा शैक्षणिक व सामाजिक वारसा लाभलेल्या सुसंस्कृत प्रतिष्ठित साळुंखे राजवंशीय कुटुंबातील योध्याचा. समाजकार्याची आवड असलेले, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे विद्यार्थी नेते आमचे मार्गदर्शक प्रतिक राजेंद्र साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त –

माणसं जपणारा, सर्वांच्या मदतीला धाऊन जाणारा, नाती जोडणारा, आपला माणूस अशी ओळख असलेले विद्यार्थी चळवळीचे अभ्यासू युवा नेतृत्व अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष प्रतिक राजेंद्र साळुंखे यांच्या सामाजिक कार्याला सलाम तसेच वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. उच्चशिक्षित असलेल्या प्रतिक दादांचे शिक्षण एम.ए, बी. एड झाले असून त्यांना समाजकार्याची प्रचंड आवड आहे. ते गेली अनेक वर्षे मराठा समाजाचे काम करीत असून मराठा समाज एकत्र यावा एकजूट राहावी यासाठी त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेला प्रयत्न असो अथवा एखादी व्यक्ती अडचणीत असेल तेव्हा क्षणाचाही विचार न करता त्यांच्या मदतीला धाऊन जाणे हा त्यांचा धाडसी स्वभाव आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, सर्वांशी आपुलकीने बोलणे असो वा विचारपूस करणे या स्वभावामुळे तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ज्येष्ठ बंधू समाजसेवक रामचंद्र ज्ञानोजीराव साळुंखे यांचे नातू व शैक्षणिक, सामाजिक वारसा लाभलेल्या प्रतिक दादांच्या सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमी अग्रणी राहिले आहेत. त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ पाहून व त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य पाहून मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक नाना यांनी या अभ्यासू युवा नेतृत्वाची विद्यार्थी सेनेच्या जिल्हाअध्यक्ष पदी एकमताने निवड केली आहे. विद्यार्थी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही आपलेसे वाटणाऱ्या प्रतिक दादांचा अनेक सामाजिक लढ्यात सहभाग असून सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थी व नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांनी सतत लढा दिलेला आहे.
समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाच्या मदतीसाठी त्यांची धडपड असते असे समाजासाठी झटणारे नेतृत्व आम्हास मिळाले आहे.
उपनगरात विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व नागरिकांना बिनधास्त वावरता यावे यासाठी बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चालू करावेत अशा मागणीचे दिलेले निवेदन, युवा पिढीला व्यसनाच्या विळख्यात अडकविण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना अडवून सिगारेट पाकिटे फुकट वाटणाऱ्या सिगारेट कंपन्यांच्या एजंट्स विरोधात कडक कार्यवाही करावी यासाठी पोलिस प्रमुखांना दिलेले निवेदन, विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा, मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांसाठी शासनाच्या वतीने विविध शैक्षणिक सवलती व योजना चालू आहेत त्याचा लाभ मिळावा यासाठी सकल मराठा समाज बैठक व मार्गदर्शन शिबिर, शिक्षण व्यवसाय आणि उद्योग मार्गदर्शन मेळावा, मराठा आरक्षणासाठी आंदोलन, गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बससेवा सुरळीत चालू करा यासाठी निवेदन, महाविद्यालय विद्यार्थी निवडणुकीत विद्यार्थ्यांना केलेले सहकार्य, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, पाणी प्रश्नासाठी उठवलेला आवाज, कोविड काळात केलेले सामाजिक कार्य, महापुरावेळी नागरिकांना केलेली मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर तसेच इतर सामाजिक कार्यात असलेला सहभाग व अशा सामाजिक कार्यातून अल्पवयातच आपली ओळख निर्माण करून एक नवा आदर्श युवा पिढीसमोर उभा करणाऱ्या प्रतिक दादांचे कार्य असेच पुढे चालत राहो व आपणास दीर्घायुष्य, आरोग्य लाभो, आई जगदंबेचा आशीर्वाद अखंड पाठीशी राहो. पुन्हा एकदा मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

– सात्विक मोहिते ( शिवाजी पेठ )

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा