ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरातर्फे १४ फेब्रुवारीला कथाकथन स्पर्धा  

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरातर्फे १४ फेब्रुवारीला कथाकथन स्पर्धा 

इचलकरंजी

येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने कै. रामभाऊ आपटे पुण्यतिथी निमित्त इयत्ता ३ री व ४ थी मधील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ या दिवशी कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहे.  सदरची स्पर्धा इचलकरंजी शहरापुरती मर्यादित आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपली नावे मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ग्रंथालयाकडे पाठवून द्यावीत. सदर स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे राहतील.                                      १) कथा मराठी भाषेतील बोधपर असावी.२) कथाकथनाचा एकूण वेळ प्रत्येक विद्यार्थ्यास ५(पाच) मिनिटे इतका राहील.३) स्पर्धा शनिवार दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता आपटे वाचन मंदिर, राजवाडा चौक (बजाज सभागृह) इचलकरंजी येथे होईल.४) विजेत्या स्पर्धकांना – प्रथम पारितोषिक- रु. ३०१/- रोख, फिरते शिल्ड व प्रशस्तीपत्र (श्रीमती लक्ष्मीबाई पुजारी यांचे स्मरणार्थ प्रा. मोहन पुजारी यांचे कडून), द्वितीय पारितोषिक – रु. २०१/- रोख व प्रशस्तीपत्र ( नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे स्मरणार्थ श्रीमती जयश्री दानवे यांचे कडून), तृतीय पारितोषिक – रु . १०१/- रोख व प्रशस्तीपत्र अशी रोख रक्कम व प्रशस्तीपत्रे देण्यात येतील.५) स्पर्धे संदर्भातील सर्व अधिकार संस्थेकडे राहतील.६) परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. असे संयोजकांकडून कळवण्यात आले आहे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा