ICHMH51NEWS.IN
9921600800

अभिनयाचे निरनिराळे पैलू उलगडून दाखवणारा  ‘ ‘ ‘नाट्यानुभव ‘

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अभिनयाचे निरनिराळे पैलू उलगडून दाखवणारा  ‘ ‘ ‘नाट्यानुभव ‘

इचलकरंजी:

 समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त प्रहसन, स्वगत, काव्यनाट्य यांचा विचारप्रवृत्त करणारा विनोदी आणि मर्मभेदी असा अनोखा आविष्कार दर्शविणारा ” नाट्यानुभव” हा कार्यक्रम संपन्न झाला. हा नाट्यानुभव ज्येष्ठ रंगकर्मी  प्रा. मिलिंद दांडेकर आणि अरुण दळवी यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने सादर केला. अन्वर पटेल यांनी पाहुण्यांचे ग्रंथ व पुष्प देऊन स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

कविवर्य वसंत बापट यांच्या ‘फुंकर ‘या कवितेचे मर्मभेदी काव्य विश्लेषण नाट्यमय स्वरुपात अरुण दळवी यांनी अतिशय भावनिकरित्या रसिकांसमोर

मांडून श्रोत्यांना अंतर्मुख केले.’गुड बाय डाॅक्टर ‘या नाटकातील स्वगत प्रा.मिलीद दांडेकर यांनी साभिनय सादर करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.याच नाटकातील एक विनोदी प्रसंग प्रा.मिलीद दांडेकर आणि अरुण दळवी यांनी सादर करुन प्रेक्षागृहातील वातावरण हास्यानी फुलवले.

तसेच अरुण दळवी लिखीत ‘मरणोत्तर ‘ हे प्रहसन मानवी जीवनाच्या सुखदुःखाच्या संकल्पना आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कशासाठी आणि कुणासाठी जीव तडफडतो हा भावविवश तसेच वास्तवावर भाष्य करणारा नाट्यानुभव रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलिवणारा होता.खूपच भावनिक मात्र  वास्तवावर प्रकाश टाकणारे हे प्रा.मिलीद दांडेकर आणि अरुण दळवी यांचे  दमदार सादरीकरण काळजाला भिडणारे होते. दोन्ही रंगकर्मींच्या अभिनयाचे निरनिराळे पैलू उलगडून दाखवणारा हा नाट्यानुभव रसिकांना अंतर्मुख करून गेला. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पांडुरंग पिसे यांनी आभार मानले.

नाट्यानुभव सादर करताना प्रा. मिलिंद दांडेकर आणि अरुण दळवी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा