येत्या काळात शेत मोजणीचे तंत्र DGPS मुळे सोपे होणार : अनिरुद्ध कपूर
डी.के.ए.एस.सी कॉलेज च्या भूगोलशास्त्र विभागांमध्ये अग्रणी कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी :
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथील भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवार, दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी “ड्रोन व डी.जी.पी.एस. सर्वेक्षणाचे भूगोलातील उपयोजन” या विषयावर एकदिवसीय अग्रणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख विभागप्रमुख डॉ. सुनिल भोसले यांनी करून दिली, तर अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक डॉ. निलोफर शेख यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या अग्रणी योजनेविषयी माहिती दिली.
प्रथम सत्रात तारा–मित्र ड्रोन अकॅडमीच्या अकाउंटेबल मॅनेजर व हेड ऑफ ऑपरेशन मा. पूजा नाईक निंबाळकर यांनी ड्रोन अप्लिकेशन व लायसन्स प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून मा. प्रो. (डॉ.) एम.ए. पाटील उपस्थित होते. तसेच सिनिअर रिमोट इन्स्ट्रक्टर मा. परनवी नाईक निंबाळकर व चेन्नई येथील ड्रोन पायलट मा. श्री. सैफुल इस्लाम यांनी हॅण्ड्स-ऑन ड्रोन ट्रेनिंग चे प्रात्यक्षिक सादर केले.
दुसऱ्या सत्रात हेक्सागोन, पुणे येथील सिनिअर इंजिनिअर मा. अनिरुद्ध कपूर यांनी DGPS चा वापर करून भूमापन व आधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञानावर माहिती दिली. मा. डॉ. निलेश सुस्वरे यांनी DGPS तंत्रज्ञान व विविध वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून मा.प्रा. (डॉ.) राजेखान शिकलगार उपस्थित होते.
समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील डॉ. एच.बी. पाटील यांच्या शुभहस्ते उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतिश पाटील व डॉ. सचिन जाधव यांनी केले, तर आभार प्रा. मेहबूब माणगावे यांनी मानले. कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयांतील तसेच दत्ताजीराव कदम महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेप्रसंगी प्रा एस के खाडे,अनिरुद्ध कपूर व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




