महापौर निवडणुकीसाठी शिव शाहू विकास आघाडीचा प्रत्येकी एक अर्ज
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ६ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शिव शाहू विकास आघाडीने महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक असे दोन अर्ज नेले आहेत. नगरसेवक सयाजी चव्हाण यांनी आज निवडणूक विभागाकडून हे अर्ज स्वीकारले.
महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




