इचलकरंजी महापौरपदाची घोषणा शुक्रवारी; चार नावे प्रदेश पातळीवर
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून उदय धातुंडे, नितेश पोवार, प्रदीप धुत्रे आणि तानाजी पोवार ही चार नावे प्रदेश पातळीवर पाठविण्यात आली असून, त्यापैकी एका नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. सदर नाव बंद लिफाफ्यातून शुक्रवारी इचलकरंजीत येणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
महापौर पदाच्या नावासाठी मिरज सर्किट हाऊस येथे ना.चंद्रकांतदादा पाटील,आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या चार नावांची शिफारस प्रदेश नेतृत्वाकडे करण्यात आली आहे. प्रदेश पातळीवर चर्चा होऊन एका उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येणार असून, हे नाव बंद लिफाफ्यात पाठविले जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी इचलकरंजी महानगरपालिका परिसरात नूतन नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत राज्याचे मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहून महापौरपदासाठी निवड झालेल्या उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी महानगरपालिकेत जाऊन महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
महापौर पदाची घोषणा कोणाच्या नावावर होते, याकडे इचलकरंजीतील राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




