ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डिपेक्स २०२६ प्रकल्प स्पर्धेत चमकदार कामगिरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डिपेक्स २०२६ प्रकल्प स्पर्धेत चमकदार कामगिरी

इचलकरंजी:
 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अभियांत्रिकी प्रकल्प प्रदर्शन डिपेक्स २०२६ या स्पर्धेत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखन्नीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक मिळविला. या प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागामध्ये शिकणा-या पार्थ व्हनवाडे, पार्श्‍व पाटील, सुमित सदलगे, प्रमोद कांबळे व संकेत संकपाळ या विद्यार्थ्यांनी ‘निरुपयोगी कागदाचा वापर करुन पर्यावरणपूरक जैवविघटनशील मल्चिंग पेपरचा विकास‘ हा अभिनव प्रकल्प सादर करुन परिक्षकांची दाद मिळवली.
एमआयटी अ‍ॅकेडमी ऑफ इंजिनिअरींग छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्देश अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये संशोधित वृत्ती विकसित करणे तसेच उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करुन नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देणे हा आहे.
डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी विकसीत केलेला हा प्रकल्प शेतीमध्ये मोठया प्रमाणावर वापरल्या जाणा-या प्लास्टिक मल्चमुळे निर्माण होणा-या पर्यावरणीय समस्येला प्रभावी पर्याय ठरु शकतो. पारंपारिक प्लास्टिक मल्चमुळे शेतजमिनीत न विद्यटन होणा-या प्लास्टिक कच-याचे प्रमाण वाढून माती व पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी टाकावू कागद आणि नैसर्गिक कृषी तंतूचा वापर करुन जैवविघटनशिल मल्चिंग पेपर विकसित केला आहे. यामुळे शेतीमध्ये योग्य ताकद, लवचिकता, आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता तसेच तण नियंत्रणाची प्रभावी क्षमता असल्याचे आढळून आले आहेे. पीकांच्या वाढीच्या कालावधीत आणि त्यानंतरही हे साहित्य पूर्णपणे जैवविघटनशिल असल्यामुळे ते नैसर्गिकरित्या विघटीत होवून मातीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत करते. ही अभिनव संकल्पना कृषी क्षेत्रातील एका महत्वाच्या पर्यावरणीय समस्येला उत्तर देणारी ठरते.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रकल्पासाठी संचालिका प्रा.डॉ. सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ व्ही.आर.नाईक, मार्गदर्शक डॉ.जी.सी.मेकळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 छ.संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या डीपेक्स २०२६ या स्पर्धेत कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते पारितोषिक स्विकारताना डीकेटीईचे विद्यार्थी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा