ICHMH51NEWS.IN
9921600800

​इचलकरंजीच्या अनुज कनोजेचे गणित प्रज्ञा परीक्षेत दैदिप्यमान यश; जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत शहराचा एकमेव ‘शील्ड’ धारक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीच्या अनुज कनोजेचे गणित प्रज्ञा परीक्षेत दैदिप्यमान यश; जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत शहराचा एकमेव ‘शील्ड’ धारक

​इचलकरंजी:
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य श्रीनिवास रामानुजन गणित प्रज्ञा परीक्षे’मध्ये इचलकरंजी महानगरपालिका संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन (शाळा क्र. २७) चा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कु. अनुज नरेंद्र कनोजे याने घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्ह्यातून निवडल्या गेलेल्या एकूण २५ प्रज्ञा शिष्यवृत्ती व शील्ड धारक विद्यार्थ्यांमध्ये इचलकरंजी शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून पात्र ठरणारा अनुज हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
​या यशाबद्दल इचलकरंजी महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी मा. बी. एम. कासार साहेब यांच्या हस्ते अनुजचे विशेष अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका डॉ. अलका शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. अनुजने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा