ICHMH51NEWS.IN
9921600800

एकतर्फी वहीफणी दरवाढीविरोधात यंत्रमागधारक आक्रमक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एकतर्फी वहीफणी दरवाढीविरोधात यंत्रमागधारक आक्रमक

इचलकरंजी
इचलकरंजी शहरात पॉवरलूम असोसिएशन व वहिफणी एजंट यांनी एकतर्फी १८ टक्के वहीफणी दरवाढ जाहीर केल्याने यंत्रमागधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता ही दरवाढ लादल्याचा आरोप यंत्रमागधारकांनी केला आहे. मागील चार वर्षांत वहीफणी दरात वाढ झाली नसली, तरी कामगारांचे वेतन, वीज बिल, सायझिंग व इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले असूनही यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळालेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर शाहूनगर, चंदूर येथे यंत्रमागधारकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत एकतर्फी दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवत सर्व संघटनांनी एकत्रित निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. कोणत्याही एका संघटनेने उद्योगावर निर्णय लादू नये, असा ठाम सूर उमटला.
दरम्यान, प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज सकाळी ९ वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व यंत्रमागधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वहिफणी दरवाढीविरोधात यंत्रमागधारकांची बैठक पार पडली
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा