सुरेशराव हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त २५ हजार वह्या व पुस्तकांचे वाटप
इचलकरंजी:
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मा. सुरेशरावजी हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहांतर्गत महानगरपालिका शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना सुमारे २५ हजार वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शैक्षणिक मदतीच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त हार-तुरे व बुके न आणता वह्या व पुस्तके भेट स्वरूपात द्यावीत आणि ती भाजपा कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन भाजपा पश्चिम मंडलाचे शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





