ICHMH51NEWS.IN
9921600800

विजया मेहता यांच्या स्मृती इचलकरंजीत जागृत ठेवाव्यात ….अभिवादन सभेतील मत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विजया मेहता यांच्या स्मृती इचलकरंजीत जागृत ठेवाव्यात.अभिवादन सभेतील मत

इचलकरंजी:

जागतिक रंगभूमीवरील ख्यातनाम अभिनेत्री व दिग्दर्शक कालवश विजया मेहता यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंगभूमीवर स्वतःची एक कर्तृत्वमुद्रा उमटवलेली होती. त्यांनी मराठी रंगभूमीला प्रादेशिकतेच्या सीमा ओलांडून जागतिक चौकट दिली. नाटकाला मनोरंजनातून विचार प्रवृत्तीकडे नेले. आपल्या दिग्दर्शनातून मांडणी व आशयाचे अर्थपूर्ण प्रयोग केले. दिग्दर्शनात कल्पकता आणि सूक्ष्म भान आणले.१९८६ साली इचलकरंजी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. तसेच १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु. ल.देशपांडे होते. विजया मेहता व पु.ल. देशपांडे यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी इचलकरंजीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात त्यांच्या इचलकरंजीशी ऋणानुबंधाची योग्य ती दखल घेतली जावी. तसेच त्यांच्या नावे दालनांची निर्मिती व्हावी असे मत  विजया मेहता आदरांजली सभेमध्ये व्यक्त करण्यात आले.

इचलकरंजी शहरातील सर्व साहित्य,नाट्य ,संस्कृती संस्थांच्या वतीने या सभेचे आयोजन समाजवादी प्रबोधिनीत करण्यात आले होते.प्रारंभी विजया मेहता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या बैठकीत दिलीप शेंडे, संजय होगाडे,प्रा. मिलिंद दांडेकर, राजन मुठाणे,अरुण दळवी, प्रकाश सुलतानपुरे , अशोक केसरकर, भाऊसाहेब केटकाळे ,दयानंद लिपारे, लालचंद पारीख, आशिष भागवत , प्रसाद कुलकर्णी आदीनी विजया मेहता यांच्या उत्तुंग कामगिरीचे विविध पैलू सांगितले. तसेच १९८६ साली विजया मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इचलकरंजीतील नाट्य संमेलनाच्या आठवणींचा स्मृतीजागरही केला. शेवटी दोन मिनिटे स्तब्धता पाळून विजया मेहता यांना आदरांजली वाहण्यात आली.

अभिवादन करताना इचलकरंजीतील कला व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा