ICHMH51NEWS.IN
9921600800

महाविद्यालयात ‘पुष्पोद्यान’ उपक्रम; शंभरहून अधिक फुलझाडांचे रोपण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाविद्यालयात ‘पुष्पोद्यान’ उपक्रम; शंभरहून अधिक फुलझाडांचे रोपण

इचलकरंजी :

वाढते नागरीकरण आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेऊन जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात ‘पुष्पोद्यान’ उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात शंभरहून अधिक फुलझाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने रोपण करण्यात आले.

यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, “निसर्ग आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना शहरांमध्ये उपलब्ध जागेत जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘पुष्पोद्यान’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन केले. रोपांची नियमित देखभाल करून महाविद्यालय परिसर हिरवागार व फुलांनी बहरलेला करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वाती हाळवणकर यांनी केले. एनएसएस सदस्य प्रा. अंकुश कुरणे यांनी रोपलागवडीचे नियोजन केले. सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे यांनी केले, तर आभार कॅ. प्रमिला सुर्वे यांनी मानले.

या उपक्रमात प्रा. मनीषा गवळी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा