ICHMH51NEWS.IN
9921600800

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेमध्ये ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेस’ उत्स्फुर्त प्रतिसाद साडेतीन कोटी रुपये जमा.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेमध्ये ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेस’ उत्स्फुर्त प्रतिसाद
साडेतीन कोटी रुपये जमा.
इचलकरंजी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. या योजनेतून महिलांना दर महिन्याला रु. १५०० इतकी रक्कम त्यांच्या संबंधित बँकेच्या बचत खात्यामध्ये प्रत्यक्षरित्या वर्ग करणार असल्याचेही जाहीर केले होते.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेचा लाभ भागातील प्रत्येक पात्र महिलेस व्हावा या उदात्त हेतूने, आमदार प्रकाश आवाडे यांनी बँकेमध्ये या योजनेचा अवलंब सत्वर करावा व महिलांना या योजनेचा लाभ विनाविलंब करून दयावा असे सूचित केले. त्यांच्या सूचनेप्रमाणे व बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक व अविरत प्रयत्नांने, बँकेमध्ये महिलांची जवळजवळ १२००० खाती उघडून घेवून, आजअखेर अशा महिलांच्या बचत खात्यामध्ये रु.३.५० कोटी इतकी रक्कम जमा झालेली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी दिली.ते पुढे असेही म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाकडून ज्या अभिनव योजना राबविल्या जातात त्या जनसामान्यांपर्यंत विनाविलंय पोहोचविण्यासाठी बँक नेहमीच कटिबध्द असून. त्याची अंमलबजावणी बँकेकडून सत्वर केली जाते याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. येथून पुढील काळातही अशा अनेक लाभदायक योजना सामान्यांपर्यंत व महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँक नेहमीच कार्यरत व कटिबध्द राहील असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी ज्या महिलांनी बँकेमध्ये बचत खाते सुरु केलेले नाही, अशा महिलांनी बँकेमध्ये बचत खाते सत्वर चालू करून, सदर योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
याचबरोबर, त्यांनी पुढे असेही आवाहन केले की, महिलांच्या खात्यामध्ये शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अशा रक्कमांची सुकन्या आणि सुवर्णालंकार रिकरींग ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास, महिलांना भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ होणार असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले. इतकेच नव्हे तर, महिलांचे सबलीकरण व वस्त्रोद्योगाबरोबरच अन्य किरकोळ व्यापारी, उद्योजक यांचेसाठीही बँकेने अलेक कर्ज योजनांचा अवलंब केलेला असून, त्याची माहिती नजिकच्या शाखेमधून घेवून, आपले उद्योगव्यवसाय विकसीत करावेत असे आवाहन केले.यावेळी बँकेचे सर्व संचालक, अधिकारी व सेवक वृंद उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा