ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रकाश मोरबाळे व अजित मिणेकर यांची इचलकरंजी शहर काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकाश मोरबाळे व अजित मिणेकर यांची इचलकरंजी शहर काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती

इचलकरंजी :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संघटन बळकटीसाठी सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत इचलकरंजी शहरासाठी दोन नवीन काँग्रेस ब्लॉकची स्थापना केली असून, शहराचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक अजित मिणेकर यांची ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी जिल्हानिहाय दौरे करून स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्र असलेल्या इचलकरंजी शहरात दोन स्वतंत्र ब्लॉकची रचना करण्यात आली.
नवनियुक्त ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची धोरणे व पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीसाठी महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे मार्गदर्शन, तसेच इचलकरंजी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे आणि राहुल खंजिरे यांचे सहकार्य लाभल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
या नियुक्तीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रकाश मोरबाळे आणि अजित मिणेकर यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अजित मिणेकर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा