ICHMH51NEWS.IN
9921600800

सेवा सहयोग फाऊंडेशनची ‘विद्यार्थी विकास योजना’; गुणवंत गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची संधी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सेवा सहयोग फाऊंडेशनची ‘विद्यार्थी विकास योजना’; गुणवंत गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची संधी

इचलकरंजी :
आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी सेवा सहयोग फाऊंडेशनची ‘विद्यार्थी विकास योजना’ राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जात, धर्म किंवा लिंगभेद न करता पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे
ठाणे जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २००९ मध्ये या योजनेची सुरुवात केली. आतापर्यंत २,८९५ विद्यार्थ्यांना तब्बल ३५.३२ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले असून आठ शाळांना ८.७९ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. या योजनेतील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला असून त्यांनी पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ८२ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
दहावीत ९० टक्क्यांहून अधिक किंवा बारावीत ७० टक्क्यांहून अधिक गुण, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेतील गुणवत्ता आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शक्यतो अडीच लाख रुपयांपर्यंत असणे हे निवडीचे प्रमुख निकष आहेत. पात्र विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन आर्थिक व सामाजिक परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड केली जाते.
महाराष्ट्रातील ३५ जिल्हे आणि २०७ तालुक्यांपर्यंत या योजनेचा विस्तार झाला असून अनेक विद्यार्थी प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. इचलकरंजी परिसरातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंकज मेहता 9423286703
आणि नरेंद्र कुलकर्णी 9922832595 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा