सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल’ बँक खाती उघडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
इचलकरंजी, ता. २१ :
सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल’ बँक खाती उघडल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश दिलीप लोहार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यावरून संदीप आण्णासो सातपुते (रा. शहापूर, इचलकरंजी) आणि विक्रम जुवेकर (रा. बेळगाव, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ ते २० जुलै २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल’ बँक खात्यांची उघडणी केली. या खात्यांचा वापर फसवणुकीतून प्राप्त झालेली रक्कम इतर बँक खात्यांमध्ये वळविण्यासाठी करण्यात येणार होता, असा फिर्यादीत उल्लेख आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





