ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी

इचलकरंजी  –
राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास याेजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डाॅ. जस्मिन यांनी पाहणी केली.
आळते येथे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात  पंचकल्याण  महामहोत्सवाचे   आयोजन केले आहे. तर श्री क्षेत्र बाहुबली येथे दर 12 वर्षांनी भगवान बाहुबली यांचा महामस्तकाभिषेक हाेत असताे. याठिकाणीही पंचकल्याण  महामहोत्सवाचे  आयोजनकेले आहे. त्यानिमित्ताने लाखाे भाविकांची उपस्थिती असणार आहे. त्या अनुषंगाने या तीर्थक्षेत्रांमध्ये अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुशाेभीकरण, वाहनतळ तसेच भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्याकडून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आले असून त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाेबत स्थळ पाहणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जस्मिन, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, जि.प.सदस्या सानिका आवाडे, साै. वर्षा सावर्डेकर, गटविकास अधिकारी शबाना, माेकाशी, बाबासाे चाैगुले, डी. सी. पाटील, सुधीर पाटील, गाेगा बाणदार, धनंजय टारे आदींनी दाेन्ही तीर्थ क्षेत्रांना भेटी देऊन तीर्थ क्षेत्र याेजना अंतर्गत करावयाच्या विविध विकासकामांची पाहणी केली. भेटीदरम्यान सीईओ डाॅ. जस्मिन यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

पाहणी करताना सीईओ जसमीन व माजी मंत्री प्रकाश आवाडे,जि प सदस्या सानिका आवाडे व अधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा