ICHMH51NEWS.IN
9921600800

कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीतील डॉक्टरांचा मूक मोर्चा,कॅडल मार्च संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीतील डॉक्टरांचा मूक मोर्चा,कॅडल मार्च संपन्न.
दि.१७ .
    कोलकत्ता येथील महिला डॉक्टरची अमानुष हत्या केलेल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील सर्व खाजगी वैद्यकीय सेवा २४ तासासाठी बंद ठेवण्यात आल्या यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या. स.१० वा मेडिकल असोसिएशन ते प्रांत ऑफिस पर्यंत इचलकरंजी व परिसरातील सर्व वैद्यकीय संघटना तर्फे मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले. या घटनेवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना देण्यात आले. तसेच गांधी पुतळा येथे स.११ ते ६ वा पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गांधी पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा चौक या मार्गावर कॅन्डल मार्च करण्यात आला .यामध्ये इचलकरंजी व परिसरातील परिसरातील महिला डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या निषेध मोर्चामध्ये मेडिकल असोसिएशन ,जनरल प्रॅक्टिशनर असो., आय एम ए,डेंटल असो., केमिस्ट असो. ,एम आर असो. क्लिनिकल लॅब असो, इचल.ऑप्टिकल असो व इतर सर्व पॅरामेडिकल सर्व्हिसेस, तसेच इचलकरंजीतील लोकप्रतिनिधी व इतर सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.
   यासाठी माईचे अध्यक्ष डॉ.शरद मिठारी सेक्रेटरी डॉ.राजेश कुंभार, डॉ गोविंद ढवळे डॉ मर्दा, जी पी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.राजन फुटाणे डेंटल असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ सौ. चैताली मगदूम, आय एम ए चे अध्यक्ष डॉ संदेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा