ICHMH51NEWS.IN
9921600800

समाजवादी प्रबोधिनीची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजवादी प्रबोधिनीची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

इचलकरंजी ता.२०समाजवादी प्रबोधिनीचे ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अशोक चौसाळकर होते. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांची प्रा. एन. डी.पाटील प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, अजित मिणेकर यांची इचलकरंजी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, प्रा. उर्मिला कदम यांची समाजवादी प्रबोधिनीच्या गडहिंग्लज शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, प्रा. कल्याणराव पुजारी यांची समाजवादी प्रबोधिनीच्या गडहिंग्लज शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि प्रो. डॉ. त्रिशला कदम यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथून प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्याबद्दल या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा सत्कार करण्यात आला. या वार्षिक सभेत प्रबोधिनीच्या उपाध्यक्ष प्रा.डॉ. भारती पाटील, प्रा. डॉ. टी.एस. पाटील, प्रा. डॉ. भालबा विभुते, ॲड. अजित सूर्यवंशी, डॉ.चिदानंद आवळेकर, प्रा. विजयकुमार जोखे, प्रा. डॉ.संजय साठे,प्रा. डॉ . काशिनाथ तनंगे, प्रा. उर्मिला कदम, प्रा. कल्याणराव पुजारी, देवदत्त कुंभार, समीर कटके आदींनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनी सुवर्णमहोत्सवी अर्थात पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलेले आहे. त्यानिमित्ताने किमान एक कोटी रुपयांचा स्थायी निधी आणि पन्नास लाख रुपये इमारत विस्तार, नूतनीकरण, अभ्यासिका निर्मिती आणि इतर सुविधांसाठी उभे करण्याचा संकल्प आगामी एक वर्षात पूर्ण करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यासाठी गेल्या पन्नास वर्षांत समाजवादी प्रबोधिनीशी जोडल्या गेलेल्या सर्वांनी आणि या कार्याविषयी आस्था असलेल्या सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले.या बैठकीला समाजवादी प्रबोधिनीच्या विविध शाखातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना भालबा विभूते व्यासपीठावर प्रा.अशोक चौसाळकर, प्रसाद कुलकर्णी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा