इचलकरंजीत धारदार गुप्ती बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
इचलकरंजी/प्रतिनिधी : शहरातील सांगली नाका परिसरात धारदार व घातक गुप्ती विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी तिघांविरुद्ध शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस शिपाई निलेश शिवाजी कोळी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सांगली नाका येथील एस.आय.टी. कॉलेज परिसरात परफेक्ट ऑप्टीकलसमोर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी मनिष पाटील (रा. कामगार चाळ, इचलकरंजी), प्रविण बाळकृष्ण खामकर (वय २०) आणि आकाश तुकाराम जगताप (वय २३, दोघे रा. आण्णा रामगोंडा शाळेजवळ, नारळ चौक, इचलकरंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी पात्याची धारदार गुप्ती जप्त केली असून तिची एकूण लांबी सुमारे १५.७ इंच आहे. तसेच या गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कंपनीची काळ्या रंगाची अवेनिस दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही आरोपींनी गुप्ती जवळ बाळगल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







