इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल
इचलकरंजी:
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओवर आक्षेपार्ह कमेंट करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्यात सुरज शिवाजी पाटील (रा. चरण, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वसीम रियाज गफारी (वय ३४, रा. गावभाग, मखदुम पीर दर्गा जवळ, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्यापूर्वी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर jay_shre_ram.33592023 या आयडीवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली.
या कमेंटद्वारे मुस्लिम समाजाचे सर्वोच्च आराध्य दैवत अल्लाह यांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







