ICHMH51NEWS.IN
9921600800

मद्यधुंद वाहनचालकांविरोधात इचलकरंजी शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम; ऑगस्टमध्ये ३५ जणांवर कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मद्यधुंद वाहनचालकांविरोधात इचलकरंजी शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम; ऑगस्टमध्ये ३५ जणांवर कारवाई

इचलकरंजी :
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम तीव्र केली असून, ऑगस्ट २०२६ महिन्यात ३५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर सन २०२६ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण २४१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
माननीय पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर वाहतूक शाखेचे सपोनि विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान ऑगस्ट महिन्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळलेल्या ३५ वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली.
सन २०२६ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत अशा २४१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची वाहने संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
मद्य अथवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविणे हे गंभीर रस्ते अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे केवळ दंड किंवा कायदेशीर कारवाईलाच सामोरे जावे लागत नाही, तर गंभीर दुखापत, आर्थिक नुकसान आणि काही वेळा जीवितहानीसारखे अपरिवर्तनीय परिणामही होऊ शकतात.
मद्यप्राशन केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवू नये. स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच कुटुंबीयांच्या आणि रस्त्यावरील इतर नागरिकांच्या जीविताची काळजी घ्यावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
मद्यधुंद वाहनचालकांविरोधात यापुढेही नियमित विशेष तपासणी मोहिमा राबवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे आणि सुरक्षित इचलकरंजीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“दारू पिऊन वाहन चालवू नका; एक चुकीचा निर्णय तुमच्यासह अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो!”
विकास शिंदे सपोनि शहर वाहतूक शाखा इचलकरंजी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा