ICHMH51NEWS.IN
9921600800

गोकुळ चौकात अवैध मटका अड्ड्यावर छापा; ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोकुळ चौकात अवैध मटका अड्ड्यावर छापा; ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी :

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटल परिसरातील गोकुळ चौकात सुरू असलेल्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत गोकुळ चौक परिसरात अवैधरित्या मटका जुगार चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा कारवाई करण्यात आली. कारवाईत ४ हजार १०० रुपयांची रोख रक्कम व ३० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.

याप्रकरणी दिलीप गणपती हारगे, अजित बाळासो कोरवी, अश्विन नवरंग देशमाने व सिद्धार्थ लहु कोकीतकर यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनिल उर्फ बबलू पवार व मोहन काजवे हे मिळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास विकास चौगुले करीत आहेत.

मटका प्रकरणी ताब्यात घेतलेले आरोपी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा