अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग; कागलच्या तरुणावर गुन्हा
इचलकरंजी :
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी कागल येथील फिरोज शमशुद्दीन नदाफ (रा. कागल) या तरुणाविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुलगी अल्पवयीन असून शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कॉलेजच्या आवारात तसेच वर्धमान चौक आणि फिर्यादीच्या घराजवळ आरोपीने तिचा वारंवार पाठलाग केला. तसेच, चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून मैत्री करण्यास सांगितले व तिचा इन्स्टाग्राम आयडी मागितल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

