ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री अतिशय क्षेत्र बाहुबली पंचकल्याणक महोत्सवासाठी २० कोटींचा निधी मंजूर आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीला यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री अतिशय क्षेत्र बाहुबली पंचकल्याणक महोत्सवासाठी २० कोटींचा निधी मंजूर

आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीला यश

इचलकरंजी : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे होणाऱ्या पंचकल्याणक महामहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे दर बारा वर्षांनी पंचकल्याणक महामहोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महोत्सवासाठी देशभरातून लाखो श्रावक-श्राविका येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.

महोत्सवाच्या अनुषंगाने हातकणंगले-नेज-कुंभोज या मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासह तीर्थक्षेत्र परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ तसेच अन्य नागरी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. वाढती भाविकांची संख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.

महोत्सवापूर्वी मंजूर कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा