ICHMH51NEWS.IN
9921600800

डेक्कन चौक, आंबेडकर नगरमार्गे खंजिरे चौकात ई-बस थांबे द्या शिवसेना (उबाठा) युवासेना गणेशनगर विभागाची मागणी; परिवहन सभापती, उपायुक्तांना निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डेक्कन चौक, आंबेडकर नगरमार्गे खंजिरे चौकात ई-बस थांबे द्या

शिवसेना (उबाठा) युवासेना गणेशनगर विभागाची मागणी; परिवहन सभापती, उपायुक्तांना निवेदन

इचलकरंजी, दि. १० ऑक्टोबर : शहरात सुरू झालेल्या ई-बस सेवेला डेक्कन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि खंजिरे इंडस्ट्री चौक येथे थांबे द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या युवासेना गणेशनगर विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे परिवहन सभापती आणि उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.

डेक्कन चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. तसेच आंबेडकर नगर आणि खंजिरे इंडस्ट्री चौक परिसरात विद्यार्थी, कामगार, कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी डेक्कन चौक–डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर–खंजिरे इंडस्ट्री चौक–शहापूर चौक या मार्गावर नियमित ई-बस सेवा सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

बस थांब्यांवर प्रवाशांसाठी निवारा शेड, दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना आणि सुरक्षित पादचारी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, मारुती बन्ने, मनोज भाट, अभिजीत लोले, सागर जाधव, रमेश जाधव, बापू जाधव, विजय देवकर, संजय माने, यलगोंडा खोत, विशाल देसाई, शाहरुख मुजावर, शिवानंद हिरेमठ, मेहबूब पठाण, जोयेब हालगले, संतोष लवटे, अजय घाडगे, सागर सातपुते, अविनाश धुगडे, दादू पाटील, सूरज कदम, कुमार जाधव, राहुल घुगरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदन देताना नगरसेवक शिवाजी पाटील यांच्यासह मलकारी लवटे व शिवसैनिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा