ICHMH51NEWS.IN
9921600800

दहा वर्षांपासून फरार असलेला घरफोडीतील आरोपी जेरबंद,जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई; शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दहा वर्षांपासून फरार असलेला घरफोडीतील आरोपी जेरबंद,जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई; शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द

जयसिंगपूर :

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. शशिकांत तानाजी ननवरे (रा. वाठार, ता. सातारा, सध्या रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७/२०१५ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४५४, ४५७ आणि ३८० नुसार घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. २३ मे २०१५ रोजी रात्री आठ ते २४ मे रोजी सकाळी नऊ या कालावधीत फिर्यादी अमोल आनंदराव रसाळ यांच्या नागाव येथील राहत्या घरात चोरी झाली होती. या गुन्ह्यातील आरोपी दहा वर्षांपासून फरार होता.

फरार आरोपींचा शोध घेण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश गवई, पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे तसेच पोलीस अंमलदार महेश कोरे, सुनील बाईत, आशुतोष कोळी, जावेद आंबेकरी आणि सुशांत डोंगळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न