ICHMH51NEWS.IN
9921600800

दैनिक केसरी,दैनिक स्वतंत्र प्रगती,ICHMH51NEWS. in च्या वृत्ताची दखल; पाण्याची नासाडी करणारा महापालिका कर्मचारी निलंबित

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक केसरी,दैनिक स्वतंत्र प्रगती,ICHMH51NEWS. in च्या वृत्ताची दखल; पाण्याची नासाडी करणारा महापालिका कर्मचारी निलंबित

इचलकरंजी :

शहरात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे पाण्याच्या टाकीतून ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत दैनिक केसरी,दैनिक स्वतंत्र प्रगती,ICHMH51NEWS ने आवाज उठवत, पाण्याची नासाडी होत असताना महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला होता. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवू शकणारी दुष्काळसदृश परिस्थिती आणि शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने १० टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठा आणि शहराची दैनंदिन गरज यामध्ये तफावत असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

मात्र, १२ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा विभागातील मजूर भूपाल दत्तू कुरणे यांनी पाण्याची टाकी भरल्यानंतर व्हॉल्व्ह बंद न केल्याने टाकी ओव्हरफ्लो होऊन पाण्याची नासाडी झाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबित केले आहे.

दैनिक केसरीने या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने कारवाई केल्याने पाणीबचतीच्या उपाययोजनांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. केवळ नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करून चालणार नाही, तर महापालिकेच्या यंत्रणेतही काटेकोर नियोजन आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. शहरातील पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या आणि व्हॉल्व्ह यांची नियमित तपासणी करणे, पाण्याची गळती व ओव्हरफ्लो रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्यांवर ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेने अशाच ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न