ICHMH51NEWS.IN
9921600800

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बांधकाम कामगारांचा पालकमंत्री आबिटकर यांच्या घरावर मोर्चा बंद केलेल्या २० योजना सुरू करा; दिवाळीला २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बांधकाम कामगारांचा पालकमंत्री आबिटकर यांच्या घरावर मोर्चा

बंद केलेल्या २० योजना सुरू करा; दिवाळीला २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी

इचलकरंजी : बांधकाम कामगारांच्या बंद करण्यात आलेल्या २० योजना पुन्हा सुरू कराव्यात आणि दिवाळीनिमित्त प्रत्येक कामगाराला २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, या मागण्यांसाठी रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या गारगोटी येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बांधकाम कामगारांच्या विविध योजना बंद करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रश्नावर पालकमंत्री आबिटकर यांनी गेल्या महिन्याभरात कोणतीही मध्यस्थी अथवा ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप लालबावटा बांधकाम कामगार संघटनेने केला आहे. त्यामुळे बंद केलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यासाठी हा मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेच्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला.

या मोर्चासाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी रविवारी दुपारी १२ वाजता गारगोटी एसटी बसस्थानक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष कॉ. भरमा कांबळे व सचिव कॉ. शिवाजी मगदूम यांनी केले आहे.

या ऑनलाइन बैठकीस कॉ. भगवान घोरपडे, कॉ. प्रकाश कुंभार, कॉ. संदीप सुतार, कॉ. आनंदा कराडे, विक्रम खतकर, नूर बेळकुडे, शिवाजी मोरे, विजय विरळीकर, आरंजय पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा