ICHMH51NEWS.IN
9921600800

विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍याचा रास्ता रोको

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍याचा रास्ता रोको

 इचलकरंजी:
अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ मिळावी. पेन्शन व ग्रॅच्युइटी बाबत ठोस निर्णय घेण्यात यावा याकरिता कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा गांधी चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी रास्ता रोको करीत निदर्शने केली.पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेत काही काळाने सोडण्यात आले.
 महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ देण्याचे महिला व बालकल्याण विकास मंत्री  आदिती तटकरे यांनी मान्य केले होते. मात्र अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युइटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पण त्याहीबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांचा विचार करून तत्काळ निर्णय घ्यावा. यासाठी  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना कृती समिती राज्यभर  रस्ता रोको,जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी मध्ये महात्मा गांधी चौकात कोल्हापूर जिल्हा  अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुनील बारवाडे, ज्योती हजारे,राजश्री जगताप,कविता कांबळे,पुष्पलता जाधव, सवीता बडवे, सुजाता जाधव, गंगुताई माने,गीता बुचडे, ज्योती पाटील आदिसह  सेविका मदतनीस सहभागी होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा