ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभारवाहनधारकांना त्रास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभारवाहनधारकांना त्रास

इचलकरंजी:

छत्रपती संभाजी महाराज चौक जवळील तुळजाराम सराफ या दुकानासमोर काही दिवसांपासून पाण्याच्या मेन पाइपलाइनला गळती लागली होती.काल पाणीपुरवठा खात्याकडून रस्ता उकरुन गळती शोधण्यात आली मात्र काल पासून उकरलेला रस्ता आणि पाणी बाजूला जाण्यासाठी मारलेली चर न मुजवल्याने  खड्डा जास्त मोठा होत आहे.त्याचा त्रास दुचाकीस्वार व मोठ्या वाहनधारकांना होत असुम अंदाज येत नसल्याने गाड्या खड्ड्यात आदळत आहेत.यामुळे अपघात होऊन दुखापत झाल्यास महानगरपालिका जबाबदारी घेणार का? अशी चर्चा तेथील नागरिक करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा