मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संधी द्या-मदन कारंडे
इचलकरंजी : कोरोची ( तालुका हातकणंगले ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सिताराम कारंडे यांच्या पद यात्रेस कोरोची नगरीतील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करीत पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.
येथील पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. तिथून पदयात्रा अमोल बेकरी परिसर, धनगर माळ, सिद्धार्थनगर , संभाजीनगर, कोरोची बस स्टॅन्ड तसेच चव्हाणवाडी या ठिकाणी या यात्रेची सांगता करण्यात आली.
दरम्यान पदयात्रेमध्ये मतदार संघाचा विकास करण्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हाला भरघोस मताने निवडून देऊन आम्ही विकास करण्याची संधी निर्माण करून देणार असल्याचे मदन कारंडे यावेळी म्हणाले. पद यात्रेमध्ये माजी नगरसेवक राहुल खंजीरे, माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव, सतीश लोहार, देवानंद कांबळे, पोपट शिंदे , आनंदा शेट्टी , अमर कोरोचीकर, अक्षय शेट्टी, अरुण शेट्टी ,रणजीत शिंदे, रशीद ढालाईत, चंद्रकांत आवळे, असलम सनदी, अजित कडाले, इम्तियाज शेख, भीमराव कांबळे, राहुल पद्मन, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, स्नेहल कोरोचीकर,सविता सपाटे, सुनंदा पद्मन,हलीमा सनदी, वंदना शिरसाट, दमयंती उकिरडे, यांच्यासह कोरोची नगरीतील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने पद यात्रेमध्ये उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









