इचलकरंजीत नाट्य रसिकांसाठी बुधवारी महिला संगीत नाटक ‘गुरुदक्षिणा’
इचलकरंजी:
येथील नाट्य रसिक आणि संगीत नाटकप्रेमी रसिकांसाठी, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘गुरुदक्षिणा’ हा संगीत नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे. कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार आणि येथील आम्ही रसिक मनोरंजन मंडळ व आम्ही कलाकार इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हे नाटक रसिकांसाठी आयोजित केले असून प्रवेश विनामूल्य आहे.
मडकई, गोवा येथील विमलानंद कला मंच या संस्थेच्या १७ युवती व महिला कलाकारांनी सादर केलेले हे आगळे वेगळे संगीत नाटक प्रथमच इचलकरंजीत होत आहे. याचे दिग्दर्शन संदीप दयानंद फडते यांनी केले आहे. सदरचा नाट्य प्रयोग बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार आहे. नाट्य व संगीत रसिकांनी या नाट्यकृतीचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने समन्वयक सचिन चौधरी आणि कपिल पिसे यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







