ICHMH51NEWS.IN
9921600800

कापड व्यापाऱ्याची २ कोटी ३७ लाखाची फसवणुक,एकास अटक.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कापड व्यापाऱ्याची २ कोटी ३७ लाखाची फसवणुक,एकास अटक.

इचलकरंजी
 इचलकरंजी शहरातील नामांकित व्यापाऱ्याकडून बंद बँक खात्यातील २५ चेकद्वारे ग्रे कापडाची खरेदी करत पैसे देण्यास टाळाटाळ करून २ कोटी ३७ लाख २४ हजार ४८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणावर पंकज जतनसिंह मेहता यांनी दिलेल्या तक्रारी नुसार इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भिलवाडा,राजस्थान येथील रजत महेश सोनी, महेश रतनलाल सोनी, रविकांत उर्फ रविराज महेश सोनी व वरुण सुर्यनारायण चौधरी अशी संशयितांची नांवे आहेत. यापैकी रजत सोनी याला अटक करण्यात आली आहे.
पंकज मेहता हे पंकज टेक्स्टाईल मिल्स आणि मे. पंकज सिंथेटीक्स मिल्स फर्मद्वारे ग्रे कापड खरेदी-विक्रीचा व्यापार करतात. त्यांच्या या फर्ममधून वरुण चौधरी या दलालाच्या मध्यस्थीने रजत, महेश व रविराज सोनी यांनी सुक्ता टेक्स्टाईल या फर्मसाठी कापड खरेदी केले होते.त्या कापडाची परस्पर विक्री अथवा संबंधित पार्टीला न देता आणि काही कापड स्वतःकडे ठेवले,कापड विक्रीचे २ कोटी ३७ लाख २४ हजार ४८ रुपयांसाठी पंकज मेहतानी  सोनी यांच्याकडे तगादा लावला होता. सोनी यांनी बंद असलेल्या एचडीएफसी बँक भिलवाडा राजस्थान बँकेचे २५ चेक दिले होते. हे मेहता यांच्या लक्षात आल्यानंतर  मेहता यांना सोनी यांच्याकडून दमदाटी केली जात होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मेहता यांनी चौघांविरोधात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत. दरम्यान, फसवणूकप्रकरणी गावभाग पोलिसांनी रजत सोनी याला भिलवाडा येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा