ICHMH51NEWS.IN
9921600800

कबनुरमध्ये धारदार शस्त्राने हल्ला, परस्परविरोधी विरोधी फिर्यादी दाखल.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कबनुरमध्ये धारदार शस्त्राने हल्ला, परस्परविरोधी विरोधी फिर्यादी दाखल.

इचलकरंजी:
सोशल मीडियावर बहिणीला फॉलो करण्याच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, दोन आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यश दिलीप काटकर (वय २०, रा. कबनूर, हातकणंगले) या तरुणाने शिवाजी कॉर्नर, कबनूर येथील चिकन ६५  गाड्यांसमोर आरोपी प्रितम प्रकाश शेटके आणि प्रकाश शेटके (दोघेही रा. साठेनगर, कबनूर) यांना त्यांच्या मुलीला इंस्टाग्रामवर फॉलो करण्याबाबत विचारणा केली.यावरून वाद वाढत गेला आणि आरोपींनी यशला शिवीगाळ करत मारहाण केली.
या वादात प्रितम शेटके याने यशला धक्काबुक्की केली,तर त्याच्या वडिलांनी प्रकाश शेटके यांनी तलवारीने थेट यशच्या डोक्यावर वार केला. मात्र यश वेळीच बाजूला झुकल्याने हा वार त्याच्या डाव्या कानावर लागला आणि कानाची पाकळी तुटून गंभीर जखम झाली. जखमी अवस्थेत यशला तातडीने आयजीएम हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी भेट दिली.
या हल्ल्याचा मनात आकस धरून मारहाण केल्याचा आरोप करत पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रात्री १० वाजण्याच्या सुमारास कबनूर येथील फॅक्टरी रोड, शिवाजी कॉर्नर येथे हा प्रकार घडला. याबाबत फिर्यादी प्रकाश वसंत शेटके (वय ५७, व्यवसाय – मटण दुकान, रा. शिवाजी कॉर्नर, कबनूर) यांनी तक्रार दिली आहे की, त्यांचा मुलगा प्रितम प्रकाश शेटके याला यश काटकर, योगेश कांबळे, शुभम पवार, लकी खान आणि फयीम राऊत यांनी मारहाण केली. या हल्ल्यात आरोपी यश काटकर याने प्रितमच्या डोक्यात दगडी फरशी घालून त्याच्या उजव्या डोळ्याला आणि तोंडावर गंभीर दुखापत केली. तसेच,योगेश कांबळे आणि शुभम पवार यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर फयीम राऊत आणि लकी खान यांनी देखील दगडाने हल्ला केला. या मारहाणीत प्रितम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आयजीएम हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत.याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा