प्रबोधिनीत गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चासत्राचे आयोजन
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ” अर्थसंकल्प २०२४-२५ ” या विषयावर जाहीर चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ ‘या विषयावर प्रा. डॉ. पी. एस. कांबळे (कोल्हापूर) आणि
‘महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२४-२५ ‘या विषयावर प्रा. डॉ. संजय ठिगळे (सांगली) हे अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक मांडणी करणार आहेत.तर चर्चासत्राचे अध्यक्षस्थान प्रो.डॉ.त्रिशला कदम भुषवणार आहेत.हे चर्चासत्र समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात गुरुवार ता. १३ मार्च २०२५, सायं.६ वाजता आयोजित केले आहे. तरी जिज्ञासू नागरिक बंधू भगिनींनी त्याला उपस्थित रहावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







