ICHMH51NEWS.IN
9921600800

विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी मध्ये क्रीडांगण प्रतिकृती व विज्ञान प्रदर्शन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी मध्ये क्रीडांगण प्रतिकृती व विज्ञान प्रदर्शन

इचलकरंजी:
विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी इचलकरंजी या ठिकाणी क्रीडांगण प्रतिकृती व विज्ञान प्रदर्शन तसेच जागतिक जलदिन उत्साहात संपन्न झाले. भारतीय जैन संघटना सेक्रेटरी पारसजी वाघोनी यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रदर्शनाच्या दालनाचे फीत कापून प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली.
         यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात अशा प्रकारचे प्रदर्शन किती महत्त्वाचे  असते जीवनाला नवी दिशा देण्याचे काम यातून होत असते असे नमूद केले.
         तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विकास चौगुले साहेब यांनी जागतिक जल दिन याविषयी बोलताना जीवनामध्ये पाण्याचे किती महत्व आहे हे पटवून दिले.
           जागतिक जल दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना यांच्या वतीने शाळेस थंड पाण्याचा जार भेट स्वरूपात देण्यात आला.
           यावेळी क्रीडांगण प्रतिकृती प्रदर्शनांतर्गत विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय खेळ, राष्ट्रीय खेळ, वैयक्तिक खेळ अशा विविध खेळाच्या प्रतिकृती तयार करून त्या खेळांची संपूर्ण माहिती सांगून सादरीकरण केले.
          विज्ञान प्रदर्शनांतर्गत हवा प्रदूषण, पाण्याचा पुष्टीयतान,वॉटर एटीएम ,कांद्याच्या रसाची जादू ,पाण्याची घनता, हवेचा दाब, अन्नपदार्थातील अन्नघटक अशा अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती सादर केल्या.
      तसेच शैक्षणिक प्रदर्शनांतर्गत   असे अनेक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांनी प्रदर्शनामध्ये मांडले होते.
       यावेळी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी गौतमजी मुथा, आशिषजी शहा, परेशजी कांगठानी,शाळेचे मार्गदर्शक दत्तात्रय देसाई, शिवानंद रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
          तसेच सर्व पालक,इतर शाळातील शिक्षक व भागातील नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नावीन्यपूर्ण प्रदर्शनाचे कौतुक केले.
        शाळेच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता हातळगे यांनी तर आभार अभिजीत नेजकर यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शनास भेट देताना प्रमुख मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा