ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत हजारो भाविकांनी घेतला सोमनाथ शिवलिंग दर्शनाचा लाभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत हजारो भाविकांनी घेतला सोमनाथ शिवलिंग दर्शनाचा लाभ

इचलकरंजी
केसरी वृत्तसेवा
इचलकरंजी येथील नामदेव भवन येथे १००० वर्षांपूर्वीचे मूळ सोमनाथ शिवलिंग “दर्शन यात्रे” निमित्त आले होते अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये धनगरी ढोलांसोबत उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले सोबत आर्ट ऑफ लिविंग  गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांचे शिष्य वरिष्ठ प्रशिक्षक दर्शक हाथी जी तसेच वेद विज्ञान महाविद्यापीठ बेंगलोर येथील वैदिक पंडित जी यांचे स्वागत करण्यात आले
दिवसभर दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली होती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मनोभावे दर्शन घेतले सायंकाळी मोठ्या उत्साहाने सत्संगाचा कार्यक्रम पार पडला दर्शन आणि सत्संग यामध्ये दिवसभरामध्ये 2000 पेक्षा अधिक भक्त सहभागी झाले
यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे भैय्या तसेच स्वयंसेवक नमिता हूल्ले, राहुल रायनाडे,मनोहर कुंभोजे विजय साळुंखे,नितीन जमाले, गोपाल चांडक, प्रदीप दरीबे,महेशजी सारडा, संगीता सारडा सर्वेश जी बांगड,विशाल पाटील, दीपक हिंगलजे,कमलेश्वर  कदम यांनी सेवा दिली
१००० वर्षांपूर्वीचे सोमनाथ शिवलिंग
सोमनाथ शिवलिंगाच्या दर्शनासाठी उपस्थित भाविक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा