५१ कोटीच्या रस्तेकामाचा आ.राहुल आवाडेंकडून आढावा
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे
नियंत्रणाखाली विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामाबाबत काही तक्रारी महानगरपालिका प्रशासना कडे प्राप्त होत आहेत.
या अनुषंगाने इचलकरंजी शहराचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित कामाचे मक्तेदार यांचे समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित मक्तेदार यांचेकडून घेतला.
सदर रस्त्यांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत याची खबरदारी सर्व मक्तेदार यांनी घ्यावी तसेच सर्व कामे मुदतीत पूर्ण करणेच्या सुचना संबंधित मक्तेदार यांना दिल्या.
या बैठकीस महानगरपालिका शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आर.व्ही.तोंदले, उप अभियंता एस.एस.पाटील, शाखा अभियंता पी.टी.मोरे, कनिष्ठ अभियंता के.सी.कांबळे, कनिष्ठ अभियंता एस.जी.पाटील, कनिष्ठ अभियंता एस.पी.शिंदे, कनिष्ठ अभियंता सी.वाय गुरव,
कनिष्ठ अभियंता बाजी कांबळे यांचेसह मक्तेदार महेश भोसले,डी.वाय.भोसले, शिवराज पाटील,बी.ए.कांबळे, राकेश कुकरेजा,सचिन कोळी आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







