ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई संस्थेस ‘केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योगाचे मंत्री संजय सावकारे यांची भेट विद्यार्थी व वस्त्रउद्योजकांशी सुसंवाद’

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई संस्थेस ‘केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योगाचे मंत्री संजय सावकारे यांची भेट विद्यार्थी व वस्त्रउद्योजकांशी सुसंवाद’

इचलकरंजी ता. २८ एप्रिल – इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे ‘आन, बान आणि शान आहे| असे गौरवोदगार देशाचे वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी डीकेटीईमध्ये काढले. डीकेटीईसारख्या संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर भारताचा लौकीक वाढवत आहेत असेही ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींजींच्या संकल्पनेतून वस्त्रोद्योग उत्पादन एक्सपोर्ट करण्यावर उदयोजकांनी भर दयावा असे आवाहन त्यांनी उपस्थित युवाउदयोजकांना केले. यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इन्स्टिटयूटमध्ये त्यांचे स्वागत केले.
भेटीदरम्यान मान्यवरांनी संस्थेच्या विविध विभागांना भेट देवून सुरु असलेल्या शैक्षणिक व संशोधन कार्याचा आढावा घेतला. त्यांनी तृतीय व अंतिम वर्ष बी.टेक टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पाहून विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट संशोधनाचे अभिनंदन केले. नवकल्पना आणि सृजनशिलतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन केले. संस्थेच्या आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत प्रयोगशाळा आणि
डीकेटीईमध्ये दिल्या जाणा-या शिक्षण व संशोधनाची गुणवत्ता निश्‍चितच वाखाणण्यासारखी आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आवाडे दादांचे आशिर्वाद घेत त्यांच्या शिक्षण व उद्योग क्षेत्रातील योगदानाचा सन्मान केला. याप्रसंगी उद्योग व शिक्षण क्षेत्रातील समन्वय वाढविण्यासाठी विविध चर्चा झाल्या.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी संस्थेचा इतिहास सांगत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले डीकेटीईचे अनेक माजी विद्यार्थी जगभरात आपली छाप पाडत आहेत. विशेषत: इचलकरंजीमधील माजी विद्यार्थी संजय कुरकुटे यांनी आंतरराष्ट्रीय १६ पेटंट मिळवले आहेत असा त्यांनी उल्लेख केला. मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा उहापोह करीत प्रकाश आण्णांनी वस्त्रो उद्योजकांच्या पुढाकाराने इचलकरंजीला शटललेस नगरीबरोबरच देशातील नंबर एकची एक्स्पोर्ट नगरी बनविण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्‍वास व्यक्त केला, त्यासाठी सरकार कडून वस्त्रोद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य मिळावे अशी भावना व्यक्त केली.
यावेळी खासदार धैर्यशिल माने, आमदार डॉ राहूल आवाडे, आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी सुनिल पाटील, डॉ ए.बी. सौंदत्तीकर, एस डी पाटील, अनिल कुडचे, स्वानंद कुलकर्णी, शेखर शहा, कार्यकारी संचालक रवी आवाडे, वैशाली आवाडे, मोसमी आवाडे, डायरेक्टर डॉ एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे. पाटील यांचेबरोबरच वस्त्रोद्योगातील उदयोजक, तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो –  डीकेटीई मध्ये भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधित असताना वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह सोबत संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व इतर
फोटो – डीकेटीई संस्थेच्या भेटीदरम्यानकेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य संजय सावकरे यांचे स्वागत करीत असताना माजी मंत्री प्रकाश आवाडे 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा