ICHMH51NEWS.IN
9921600800

दहावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दहावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान

इचलकरंजी:
आजच्या स्पर्धात्मक युगात दहावीचे सर्व विद्यार्थी आणि पालकांसमोर, पुढे काय करायचे याबाबत अनेक प्रश्न समोर उभे असतात. यावर विशेष मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध करिअर समुपदेशक, वक्ते आणि लेखक विवेक वेलणकर, पुणे यांचे ‘दहावीनंतर करिअर निवडताना…’ हे माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला असून मंगळवार दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे व्याख्यान होणार आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी आणि आता दहावीस गेलेले विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी सदरचे व्याख्यान उपयुक्त असून यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी संबंधित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा