इचलकरंजी महापालिकेकडून मालमत्ता कर भरणाऱ्यांना सवलत ऑनलाईन देयके उपलब्ध; वेळेत भरणा करणाऱ्यांना संयुक्त करात १०% पर्यंत सूट
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व पाणीपट्टीची देयके ऑनलाईन प्रणालीद्वारे तयार करण्यात आली असून, लवकरच त्याचे प्रत्यक्ष वाटप सुरू होणार आहे. यासंदर्भात महापालिकेकडून सूट/सवलतीच्या योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.प्रशासकीय निर्णयानुसार, जे मिळकतधारक दुसऱ्या सहामाहीचा संपूर्ण मालमत्ता कर (थकबाकीसह) आगाऊ भरतील, त्यांना खालील प्रमाणे संयुक्त करात सुट दिली जाणार आहे:१५ जुलै २०२५ पर्यंत कर भरल्यास – १०% सवलत,१६ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान – ४% सवलत,१ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान – ३% सवलत,१६ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान – २% सवलत दिली जाणार आहे
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, वरील सवलतींसाठी ठरवलेली मुदत अंतिम आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ किंवा निवेदन ग्राह्य धरले जाणार नाही.
कर भरण्यासाठी महानगरपालिकेची वेबसाईट: www.ichalkaranjimnp.in वर मे महिन्यापासून सर्व देयके पाहता व डाऊनलोड करता येतील.नोंदणीकृत मोबाईल व ई-मेल आयडीवर देयकांची लिंक एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेली आहे.व्हॉट्सअॅप व चॅटबॉट सुविधा: ७०३००३३६३६ या क्रमांकावर उपलब्ध असून, तेथूनही देयक मिळवून त्वरित ऑनलाइन भरणा करता येईल.ज्यांना ऑनलाईन सेवा वापरता येत नाही, त्यांनी थेट महापालिकेच्या मुख्य कार्यालय किंवा संबंधित विभागीय कार्यालयात जाऊन देयकाची प्रत घेऊन कर भरावा.चेकद्वारे रक्कम भरणाऱ्यांनी विहित कालावधीत चेक सादर करावा, अन्यथा सवलत अनुज्ञेय राहणार नाही.
“नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत भरून दिलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील यांनी केले आहे. ही माहिती मूल्यनिर्धारण व कर संकलन अधिकारी अरिफा नुलकर यांनी दिली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







