इमनपा वर्धापन दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष आणि ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या सुचनेनुसार वृक्ष आणि ग्रंथ दिंडी सारख्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या दिंडीचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या दिंडी मध्ये महानगरपालिकेचे सर्व पुरुष अधिकारी कर्मचारी पारंपरिक वारकरी वेशभूषेत तसेच सर्व महिला अधिकारी कर्मचारी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या.
शुभारंभ प्रसंगी खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ राहुल आवाडे यांनी वृक्ष आणि ग्रंथ दिंडीसह महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्वच उपक्रमांचे कौतुक केले.
वृक्ष आणि ग्रंथ दिंडी शिवतीर्थ येथुन महात्मा गांधी चौक – राजवाडा चौक -मार्गे मंगलधाम या ठिकाणी सदर दिंडीचा समारोप झाला.
या प्रसंगी उपायुक्त नंदू परळकर,उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, पुंडलिक जाधव, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते,सहा.आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर,
सहा.आयुक्त रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉ सुनीलदत संगेवार,कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी निमित्त आयोजित कार्यक्रमात खा.धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील.
Advt
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








