इचलकरंजीत विविध प्रभागांतील विकासकामांचे उद्घाटन व वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आज खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेस रु. ७ कोटी २६ लाख १५ हजार ४५३ इतका निधी प्राप्त झाला असून, त्यातून प्रभागवार विविध ठिकाणी रस्ते व गटार बांधकामाच्या कामांना प्रारंभ झाला आहे,प्रभाग क्र. २५: भाजपा कार्यालय ते छत्रपती संभाजी महाराज चौक रस्त्याच्या उजव्या बाजूला गटार बांधकाम,प्रभाग क्र. २१: महात्मा फुले पुतळा परिसर – मारुती खामकर ते दीपक कटरली, सुभाष बुचडे, संदीप शिंगे व हंगारे घरापर्यंत हाफ राऊंड गटार,प्रभाग क्र. १८: श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर – बाहुबली इलेक्ट्रॉनिक्स, मा. जिल्हा न्यायाधीश साहेबांचे घर, इजि. रियाज, टार्गेट क्लासेस ते डील घर रस्त्यांचे डांबरीकरण,प्रभाग क्र. १६: महालक्ष्मी नगर – संजय शेटे ते मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंस गटार बांधकाम,प्रभाग क्र. २३: पुजारी मळा परिसर – शिंदे ते लतंगे घर रस्ता, लोहार ते शिवाजी पुजारी घर रस्ता काँक्रीटीकरण आणि गटार,प्रभाग क्र. ३०: पिरगोंडा पाटील घर ते रेणुका माता मंदिर रस्ता काँक्रीटीकरण,प्रभाग क्र. ३०: डेक्कन जॅकवेल ते कट्टीमोळा रस्ता खडीकरण कामे आज सुरू करण्यात आली.या उद्घाटन सोहळ्यासोबतच शहापूर प्राथमिक शाळा परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या शववाहिकेचे पूजनही करण्यात आले.
Advt
समारंभात आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अमृत भोसले, महादेव गौड, दिपक सुर्वे, युवराज माळी, दादा भाटले, राजू आलासे, रणजीत अनुसे, प्रमोद बचाटे आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विकासकामाचे उद्धाटन करताना खा.धैर्यशील माने, आ.राहुल आवाडे व आयुक्त पल्लवी पाटील.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








