इचलकरंजीत दोन घटनांमध्ये पानपट्टीचे नुकसान व जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी चौघांविरोधात गुन्हे दाखल
इचलकरंजी
शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात गावभागातील नितेश मारुती पाटील यांच्या साई पान शॉपचे नुकसान करण्यात आले. पिंटू कोळी यांच्या कडून माहिती मिळताच त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी संजय तारदाळे, बाजी कोरवी आणि निखील दुधाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या घटनेत विक्रमनगर येथील महादेव मांडवकर यांच्या घरी येऊन त्यांच्या मुलाबद्दल विचारणा करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संजय तारदाळे, बाजी कोरवी, वैभव कोरवी व निखील दुधाणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १७०/१ नुसार कारवाई केली असल्याची माहिती इचलकरंजी पोलीस ठाण्याने दिली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







