गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिरात सन्मान.
इचलकरंजी :
दातार मळा येथील श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिराच्या वतीने पहिल्यांदाच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाने मंदिराच्या सामाजिक कार्यात एक मानाचा तुरा रोवला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात देवी पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव हायस्कूलचे माजी उपमुख्याध्यापक श्री महाजन गुरुजी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, शिस्त व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी मंदिर कमिटी सदस्य श्री शिवप्पा म्हेत्री, श्री सिद्धराम देवकारे, श्री चौडाप्पा खराडे, श्री संजय लोणी, श्री नागेश पालापुरे आदी उपस्थित होते. महिला मंडळ अध्यक्षा सौ. अन्नपूर्णा लोणी यांनी स्वागत केले, तर सूत्रसंचालन सौ. राजश्री नीलगार यांनी केले. विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री चौडेश्वरी महिला मंडळ यांनी केले होते. युवक मंडळ अध्यक्ष श्री गणेश गुळगी, उपाध्यक्ष श्री गुरु सलगर, सचिव महादेव चौगले, कोषाध्यक्ष अभिजीत माडगुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आभार अमर सिंदगी यांनी मानले.
Advt
यावेळी मंदिर कमिटीचेअध्यक्ष प्रकाश सलगर,कार्याध्यक्ष बाळासाहेब खराडे,उपाध्यक्ष सिद्धराम कळसे,अण्णासाहेब खोत,ललित लोणी,सचिव मनोज खराडे,सहसचिव रवींद्र केदारी,कोषाध्यक्ष दिगंबर साबा यांच्यासह महिला भगिनी, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







