इमनपाच्या ताफ्यात दोन नवीन सक्शन अँड जेटिंग मशीन व पाणी पुनर्वापर यंत्रणा समाविष्ट — ड्रेनेज सफाई अधिक प्रभावी होणार
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन स्वच्छतेच्या कामात अधिक गती आणि परिणामकारकता येण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात दोन नवीन सक्शन अँड जेटिंग मशीन आणि पाणी पुनर्वापर (वॉटर रिसायकलिंग) यंत्रणा समाविष्ट करण्यात आली आहे.
यापूर्वी केवळ एका जेटिंग मशिनच्या सहाय्याने शहरातील ड्रेनेज सफाई केली जात होती. त्यामुळे अनेक वेळा अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग अंतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून १८.५ टन व ७.५ टन क्षमतेची ही अत्याधुनिक यंत्रणा मंजूर झाली.या नवीन वाहनांचे पूजन गुरुवार, दि. १९ जून रोजी आयुक्त सौ. पल्लवी पाटील यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त सौ. सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार आणि उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पूजनानंतर त्वरित मशीनचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत या कामाची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.
Advt
यामुळे ड्रेनेज लाईनमधील अडथळे अधिक वेगाने व परिणामकारक पद्धतीने दूर होतील,ही यंत्रणा पूर्णतः मनुष्यविरहित असून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित होईल.पाण्याचा पुनर्वापर होणार असल्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक बचत होईल.
यावेळी मुख्य लेखापरीक्षक सौ. आरती खोत, सहा. आयुक्त रोशनी गोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत संगेवार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे, वाहन अधीक्षक प्रशांत आरगे, विद्युत अभियंता इसरार बेग, हर्ष माळगे, तसेच आर्यन कंपनीचे प्रतिनिधी विक्रम गायकवाड व सर्व्हिस इंजिनीअर वैभव सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








