ICHMH51NEWS.IN
9921600800

भाजपच्या वतीने योग दिन साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपच्या वतीने योग दिन साजरा

 
 
इचलकरंजी
 
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचगंगा नदी तीरावरील रेणुका मंदिराच्या प्रांगणात योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
Advt
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने योग हेच जीवन योग हेच स्वास्थ असा संदेश देत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभ मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर योग प्रशिक्षक सुहास पवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांकडून योगाची विविध प्रात्यक्षिके करून घेतली. यानिमित्ताने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, सुंदर आणि निरोगी आरोग्यासाठी नित्य योगा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने योग साधना करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, योग शिबीर जिल्हा संयोजक अरविंद माने, शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, सुनिल पाटील, शेखर शहा, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, जयेश बुगड आदींसह भाजपाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा