कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “भविष्यातील करिअर संधी व मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “भविष्यातील उज्वल करिअर संधी व मार्गदर्शन” या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २४ जून २०२५ रोजी सायं. ४.०० ते ६.०० वा. श्री. नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे होणार आहे.
Advt
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शिरीष शितोळे (विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग, महावीर कॉलेज, कोल्हापूर) व ए. एम. केसरकर (समुपदेशक व करीअर मार्गदर्शक, डी.के.टी. एज्यु. सोसा. इचलकरंजी) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर व मा. अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग यांची उपस्थिती लाभणार आहे. इचलकरंजी शहर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद तसेच पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







